पुणे शहर

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी मध्ये सलग दुसऱ्यांदा रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान

१०० जणांची अँटीबॉडी टेस्ट

पुणे : सध्या रक्ताचा तुटवडा खूप जाणवत असल्याने 3 महिन्यांपूर्वी पहिले रक्तदान आणि लगेच दुसरे रक्तदान सनसिटी मध्ये आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

त्याच बरोबर कोरोना होऊन गेला असल्यास कळाला देखील नसू शकतो.अशी देखील शक्यता असू शकते त्यामुळे अँटीबॉडी टेस्ट देखील करण्यात आली.यात देखील 100 च्या वर लोकांनी सहभाग नोंदविला

या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन समीर रुपदे, रिचा भागवत, आदित्य सहस्रबुद्धे, श्रुती पुणतांबेकर, चेतन नातू, स्नेहा भट, रेवती वगळे, नीरजा सहस्रबुद्धे, निकिता वगळे, रेणुका कारंडे, हर्षदा सहस्रबुद्धे, प्रिया कुलकर्णी, शिवानी ठाकूर, रोहित कडू, पियुष चव्हाण, प्रणय खिरीड, रावसाहेब शिंदे, कैलास जतकर, यांनी केले होते

यावेळी आमदार भीमराव तापकीर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पुणे शहर सुधारणा समिती अध्यक्ष नगरसेक प्रसन्न दादा जगताप, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष सुनील मारणे, भाजप पुणे शहर सरचिटणीस दिपक नागपुरे, भाजप खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे, राजाभाऊ शेंडगे, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंदजी भोई, रवी शिंगणापूरकर, शरद जगताप, संपत चरवड, केतन घोडके, साईनाथ कदम, राजाभाऊ कुडले, शैलेश अभ्यंकर आदी मान्यवर यांनी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये