रविंद्र धंगेकरांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोथरूडमधील पदयात्रेत सहभागी
पुणे : प्रभाग क्र.११, रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर कोथरूड, पुणे ३८ रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सायं. ५.३० वाजता ३४ पुणे लोकसभा महाविकास आघाडी तसेच इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शिवतिर्थनगर कोथरूड मध्ये पदयात्रा / बाईक रॅली / जीप रॅलीचे आयोजन प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी येथे स्थानिक माजी नगरसेवक रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी केले होते.
या पदयात्रेस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रवक्ते गोपाळ तिवारी, तसेच ॲड.रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम माजी नगरसेवक, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, तानाजी निम्हण,योगेश मोकाटे, प्रशांत बधे, माजी नगरसेवक, महिला अध्यक्षा मनिषा आनंद, डॉ, अभिजीत मोरे आम आदमी पार्टी (आप), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे , राजेश पळसकर, विजय खळदकर, जयदीप पडवळ, रविंद्र माझिरे, संदीप मोकाटे,मनिषा करपे, सविता मते,ज्योती सुर्यवंशी, दिलीप गायकवाड,नितीन पवार, यशराज पारखी, जयाशेठ किराड,संतोष डोख,अनिल घोलप, नयना सोनार,तसेच महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट, भारत जोडो, लोकायत व मित्र पक्षांचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.