माहिती अधिकाराचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करून फसवणूक करणाऱ्या फरार रवींद्र बऱ्हाटेला अखेर अटक
पुणे : माहिती अधिकाराचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करून फसवणूक करणारा आणि मोक्कामध्ये फरार असलेल्या
माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ब-हाटे फरार होता. पुणे
पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती.
शहरातील विविध पोलिस ठाण्यात रवींद्र बहाटे
याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
माहितीअधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्याविरूध्द चतुःश्रृंगीसह शहरातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काही दिवसांपुर्वीच त्याची पत्नी संगीता रवींद्र बहाटे यांना देखील अटक केली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यानंतर रवींद्र बऱ्हाटेच्या मुलाला देखील अटक केली. त्यानंतर पोलिसांनी बहाटेला मदत करणाऱ्या सुनील मोरे याला देखील अटक केली. रवींद्र बऱ्हाटेसह बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, तथाकथित पत्रकार देवेंद्र जैन, सांगलीचे संजय भोकरे आणि इतरांविरूध्द गुन्हे आहेत.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता , सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे ,अप्पर आयुक्त अशोक मोराळे,उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र बऱ्हाटे याला अटक केली आहे. रवींद्र बऱ्हाटे फरार असलेल्या कालावधीत त्याला कोणी कोणी मदत केली. याचाही पोलिस तपास करीत आहेत.




