महाराष्ट्र
दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मुक्त संचार! राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता महाराष्ट्र हळूहळू संपूर्ण अनलॉक होण्याच्या दिशेनं प्रवास करत आहे. शाळा, मंदिरं सुरु झाल्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिलीय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. दिवाळीत कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन लोकांना होणाऱ्या या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळी नंतर निर्णय घेतील, असं टोपे म्हणाले.
