कोथरुड

कर्तृत्ववान नवदुर्गांचा कोथरुड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या वतीने सन्मान..


कॉफी विथ नवदुर्गा च्या माध्यमातून नवदुर्गांशी संवाद

कोथरुड : pune city, kothrud  सामाजिक शैक्षणिक कला क्रिडा आरोग्य या क्षेत्रात चौकट ओलांडून आपल्या कर्तुत्वाने भरीव कामगिरी करीत समाजाला वेगळी दिशा व प्रेरणा देण्याचे काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान कोथरूड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या वतीने करण्यात आला. ‘कॉफी विथ नवदुर्गा’ या वेगळ्या संकल्पने अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात या कर्तृत्ववान नवदुर्गांशी संवाद साधण्यात आला.

अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीमध्ये आपल्या जिद्दीच्या जोरावर सीमोल्लंघन करीत आपल्या कर्तुत्वाचा डंका वाजविलेल्या नवदुर्गांचा कोथरूड भारतीय जनता युवा मोर्चा वतीने आयोजित करण्यात आलेला सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सन्मान सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेत्या, 23 गोल्ड मेडलिस्ट तेजस्विनी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुमेधा चिथडे, दिशा दिंडे, अनुराधा एडके, प्रियांका चौधरी, स्वरुपवर्धीनीच्या सेविका, अनिता गोसावी,  मोनिका गोळे, आरती देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.

समाजातील प्रत्येक स्त्रीचा फक्त नवरात्रोत्सव अथवा महिला दिनीच सन्मान न होता प्रत्येक ती चा सन्मान हा प्रत्येक दिवशी होणे गरजेचे आहे यासाठी इथून पुढच्या काळात भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील अशी माहीती दुष्यंत मोहोळ यांनी दिली. या कार्यक्रमावेळी नगरसेवीका वासंती जाधव, नगरसेवीका हर्षली माथवड, भाजप कोथरुड मतदारसंघ अध्यक्ष पुनीत जोशी, वर्षा डहाळे, हर्षदा फरांदे, कांचन कुबंरे, युवा मोर्चा कोथरूडचे सर्व पदाधीकारी उपस्थित होते.

Img 20211014 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये