पुण्यातील नाट्य रसिकांसाठी आनंदाची बातमी : नाटकांची तिकीट विक्री आजपासून सुरू

कोथरुड : pune city, kothrud २२ ऑक्टोबर पासून नाट्यगृह सुरू होत असल्याने बालगंधर्व रंगमंदिर व कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या नाटकांच्या तिकीट विक्रीला आजपासून सुरुवात करण्यात आली. बऱ्याच कालावधी नंतर नाट्य रसिकांना आता आपल्या आवडत्या नाटकांचा आनंद घेता येणार आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २३ ऑक्टोबरला शनिवारी मधुरा दातार, ऋषिकेश रानडे, सलील कुलकर्णी यांचा सहभाग असणार चंद्र पुनवेचा हा कार्यक्रम होणार आहे, तर २४ ऑक्टोबरला दुपारी १ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व सायंकाळी ५.३० बालगंधर्व रंगमंदिरात प्रशांत दामले व कविता मेढेकर यांची प्रमुख भूमिका असलेले एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्याची तिकीट विक्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पासून सुरू करण्यात आली आहे. कोथरुड येथे तिकीट विक्रीचा शुभारंभ नाट्य निर्माते सत्यजित धांडेकर यांच्या उपस्थित करण्यात आला.
सत्यजित धांडेकर म्हणाले की, कोरोना संकटामुळे अनेक दिवस नाट्यगृह बंद होती पण ती आता पुन्हा सुरू होत असल्याने बऱ्याच कालावधीनंतर आवडती नाटके रसिकांना पाहता येणार आहेत. कोरोनामुळे मनावर आलेला ताण कमी करण्यास नाटकांमुळे मोठी मदत मिळणार आहे. आज पासून नाटकांची तिकीट विक्री सुरू करण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आहे. रसिकांनी ही नाट्य प्रयोगाची तिकीट घेऊन नाट्यकर्मी व नाट्यनिर्माते यांचा उत्साह वाढवावा




