राष्ट्रीय

१ मे पासून वय वर्ष  १८ च्या पुढील सर्वांना लस मिळणार ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दिल्ली : दिवसेंदिवस देशातील कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. आता पर्यंत वय ४५ पुढील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात होती, पण आता कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला असून आता आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

लसीकरण मोहिमेस सुरवातीला 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला . 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सूरवात झाली.  आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

लसीकरणाच्या  तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी दिली गेली आहे.  कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत ची माहिती ए एन आय ने ट्विटर द्वारे दिली आहे.

Img 20210223 wa0156

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये