पुणे शहर

कोथरूड मतदारसंघातील माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी मेळावा


अमोल बालवडकर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना साडी भेट

पुणे : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मतदारसंघातील शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी मेळावा घेण्यात आला.

तसेच नाव नोंदणी अभियानांतर्गत कोथरूड मतदारसंघातील या परिसरांमध्ये ज्या महिलांनी सदरील योजनेंतर्गत नावनोंदणी केली आहे, त्या सर्व महिलांना अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने आज आशिष गार्डन, कोथरूड येथे आकर्षक साडी भेट म्हणून देण्यात आली. माता भगिनींना साड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील , माजी नगरसेवक आणि आयोजक अमोल बालवडकर तसेच फाउंडेशन चे सभासद  व इतर मान्यवर आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

Screenshot 2024 07 22 11 03 08 611919599655570391331
Img 20240722 wa00034144807819965542499
Fb img 16474137314571819310932637888379
Img 20240404 wa00127754739105663743070
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये