पुणे शहर

कोथरूडमधील महिलांनी लुटला गौतमी पाटीलच्या नृत्याविष्काराचा मनमुराद आनंद..

कोथरूड : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याविष्काराचा आनंद कोथरूड मधील महिलांनी मनमुराद घेतला. काही महिलांनी तर मंचावर जाऊन गौतमी पाटील बरोबर ठेका धरत  आपली नृत्याची हौस पूर्ण केली. निमित्त होते नवरात्रनिमित्त आयोजित गौतमी पाटील नृत्याविष्कार कार्यक्रमाचे..

अखिल पौड फाटा नवरात्र उत्सवच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटील नृत्याविष्कार कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहत महिलांनीही गाण्यावर थिरकत जल्लोष केला. गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी पहिल्यांदाच एवढया मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. गेली पंधरा दिवस कोथरूड परिसरात कॅनॉल रोडला होणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची चर्चा होती. कार्यक्रमाला महिलांना प्राधान्य असल्याने महिला वर्ग आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होता.

सोहम होले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. रुपेश अटक व आकाश शेडगे हे अखिल पौड फाटा नवरात्र उत्सवाचे  उत्सव प्रमुख आहेत तर आकाश मोकर हे निमंत्रक आहेत.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हटलं की आतापर्यंत केवळ पुरुष वर्गच प्रेक्षक म्हणून त्यांच्या कार्यक्रमाचा आनंद घेत आला आहे. आज पहिल्यांदा महिलांसाठी त्यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यामुळे कोथरूड मधील महिलांना बहुचर्चित नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा अविष्कार पाहता आला. मी सताऱ्याची फूलछडी, बघणं कुणीतरी अशा अनेक लवण्यांवर नृत्य सादर करत गौतमी पाटीलने उपस्थितांची मने जिंकली.

अखिल पौड फाटा नवरात्र उत्सवात कार्यक्रमाचे नेटके नियोजन करत महिलांना प्राधान्य देण्यात आल्याने त्यांना या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेता आला. त्यामुळे आयोजनकांचे मंदार बलकवडे यांनी कौतुक केले.

Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये