पुणे शहरराजकीय

नरेंद्र मोदींकडून फडणवीसांचे कौतुक; पुणे मेट्रोसाठी फडणवीसांच्या पाठपुराव्याची दिली माहिती.

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुकही केले. पुणे मेट्रोसाठी त्यांनी कसा तगादा लावला. याची सर्व माहितीच मोदी यांनी सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कसे योगदान दिले याचे जाहीर कौतुक आपल्या भाषणातून केले. मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ते या प्रोजेक्टला घेऊन सारखे दिल्लीला यायचे. खूप मागे लागले होते, या प्रकल्पासाठी. त्यांच्या प्रयत्नांचेही हे यश आहे. त्यांचेही अभिनंदन म्हणत त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले.

पुण्याने शिक्षण, संशोधन, आयटी, बिझनेसमध्येही आपली ओळख मजबूत केली आहे. अशात आधुनिक सेवा सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहेत. आमचे सरकार पुण्याची गरज ओळखून काम करते आहे. मी आज आनंदनगरपर्यंत प्रवास केला. ही मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होईल. राहणे आणखी सोपे होईल.

Whatsapp image 2022 03 05 at 5. 36. 32 pm
Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये