दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कडक कारवाईची गिरीश गुरूनानी यांची मागणी..

पुणे : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणात जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गिरीश गुरुनानी यांनी आक्रमक भूमिका घेत रुग्णालयावर गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात गुरुनानी यांनी अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोकडे मॅडम यांची भेट घेयून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. एखाद्याच्या जीवापेक्षा दहा लाख हॉस्पिटलला जास्त प्रिय होते का ? नावालाच धर्मदाय हॉस्पिटल का? असे प्रश्न गिरीश गुरूनानी यांनी उपस्थित केले असून कारवाई नाही केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुरूनानी म्हणाले, धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्या सोबत घडली आहे. जर असल्या गोष्टी सत्तेतल्या आमदाराच्या स्वीय सहाय्यक बरोबर होत असतील तर सर्व सामान्यांनी कोणाकडे बघावे…हा प्रकार डॉक्टरी पेशाला कलंक लावणारा असून या निगरगठ्ठ व्यवस्थेला वेळीच रोखले नाही तर येणारा काळा भयंकर असेल त्यामुळे अशा लोकांना कठोर शासन होणे आवश्यक आहे.







