महाराष्ट्र

अवधान लघुपटाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनने अध्ययन अक्षमता या  विषयावर निर्मित केलेल्या “अवधान” या लघुपटाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे करण्यात आले.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर,हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस्मिता हुद्दार,सहयोगी प्राध्यापक डॉ गायत्री शिरूर,डॉ.अमित मिसाळ , सहाय्यक प्राध्यापक निशा कुट्टी, पुनम मिश्रा,उत्तमचंद लेहरचंद ट्रस्ट फाउंडेशनचे कबीर भोगीलाल,निखिल पाटील उपस्थित होते.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

“अवधान” या लघुपटाच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना मिळणारे शिक्षण, तसेच समाजाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये  अध्ययन अक्षमतेची लक्षणे काय आहेत ती समजून घेऊन मुलांच्या विकासावर लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे. याबाबतीत जनजागृती करून शिक्षक, समाज व पालक यांना अध्ययन अक्षमतेची शंका कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करणारी ही फिल्म असून  या ॲनिमेटेड फिल्म साठी जेष्ठ कलावंत नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे. याप्रसंगी विद्यापीठामध्ये दिव्यांग केंद्र निर्माण करण्यासंदर्भात  सर्वसमावेशित चर्चा  करण्यात आली.

Img 20250310 wa02324095435649637866308
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये