पुणे शहर

येरवड्यात पुणे मेट्रोचा भाग कारवर कोसळला

पुणे : येरवडा येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरू असताना अचानक काही भाग रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर कोसळल्याने गोंधळ उडाला. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेमुळे महामेट्रोच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मेट्रोचे काम सुरू असताना खालून वाहतूक होत असते मात्र असे प्रकार घडणार असतील तर वाहतुकीचा सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. मेट्रोचे काम सुरू असताना अशा प्रकारे अपघात घडणे ही बाब गंभीर असून भविष्यात अशा घटना घडून आहेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

याबाबत पुणे मेट्रो काय भूमिका घेणार वाहतूक व काम सुरू असलेल्या ठिकाणी असलेले यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्या ठोस उपाययोजना करणार हे पहावे लागणार आहे.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये