कोथरुड

नगरसेविका अल्पना वरपे यांच्याकडून कोथरुड पोलीस स्टेशनला कोरोना सुरक्षा किट..

कोथरुड : कोरोनाचे संकट आल्यापासून पोलीस कर्मचारी समाजाच्या सुरक्षेसाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रस्त्यावर उभे आहेत. अनावश्यक बाहेर फिरून कोरोनाचे संसर्ग वाढवू नका असे आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोथरुड मधील याच पोलीस बांधवांच्या सुरक्षतेसाठी नगरसेविका अल्पना वरपे व भाजपा युवामोर्चा प्रदेश चिटणीस अॅड.गणेश वरपे यांच्या वतीने कोरोना सुरक्षा किट व इतर सामानाचे वाटप कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले. Corona security kit to Kothrud police station from corporator Alpana Warpe.

कोथरूड पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचार्‍यंकरिता वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघःश्याम डांगे यांच्याकडे फेस मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हॅन्डग्ल्व्होज तसेच नाकाबंदी बंदोबस्त ठिकाणी पोलिस सबइन्स्पेक्टर घोडके यांच्याकडे कर्मचार्‍यांकरिता तंबू, बिस्किट, केळी देण्यात आली.

यावेळी स्विकृत सभासद वैभव मुरकुटे,सागर कडू,कैलास मोहोळ,अक्षय ढाकणे,प्रदिप जोरी,अजय वरपे, अॅड.उमेश दिवाणे, गणेश लोखंडे, विनायक वरपे , ओंकार शिंदे, योगेश माथवड, प्रशांत बलकवडे, सागर गायकवाड, काकडे आदि उपस्थित होते.

IMG 20210430 WA0001

अल्पना वरपे म्हणाल्या गतवर्षी पासून कोरोना महामारीने थैमान घातले असून या महाभयंकर अजारामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत.याच काळात या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून आखण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून महत्वाची भूमिका बजावत असलेला घटक म्हणजे पोलिस प्रशासन . आज देखील दुसर्‍या लाटेत लाॅकडाऊनच्या काळात  स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर बंदोबस्तात असलेले पोलिस आपल्याला दिसतात, त्यांच्या प्रती निश्चितच अभिमान वाटतो, याच भावनेतून व त्यांना स्वतःची प्राथमिक काळजी घेता यावी या विचारातून त्यांना कोरोना सुरक्षा किट दिल्याचे वरपे यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close