महाराष्ट्र

रुग्णालयातून बाहेर येताच शरद पवारांचे पक्षाला आदेश ; सीएम फंडासाठी राष्ट्रवादीने दिला एवढा निधी..

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री सहाय्यता फंडात निधी देण्यासाठी आपल्या पक्षाला आदेश दिले आहेत. एका कागदावर स्वहस्ताक्षराने याबाबतच्या सूचना त्यांनी पक्षातील संबंधितांना दिल्या आहेत. 

या सूचनेनंतर मुख्यमंत्री सहाय्यता फंडात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने एक कोटी व पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पवार यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे
एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या.

या कामत दिरंगाई न होता तातडीने ही मदत मिळावी यासाठी शरद पवार यांनी एका कागदाच्या कोपऱ्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या.

IMG 20210430 WA0001

रुग्णालयात असतानाही शरद पवार हे सातत्याने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती असो रुग्णालयात असतानाही त्यांचे या परिस्थितीवर लक्ष होते. नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण लक्षात घेऊन त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्षसहकाऱ्यांना तातडीने मदतनिधीसंबंधीच्या सूचना दिल्या. पक्षाकडून ही याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close