गुढी पाडव्याचा शुभ मूहूर्त; सोने-चांदीचे आजचे दर

पुणे : पुण्यात प्रति दहा ग्रॅमचा 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 तर २४ कॅरेट सोन्याचा दर 52,550 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 676 रुपये आहे.
उपयुक्त माहिती
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक व्यवसायिकांना संपर्क साधा.)











































