पुणे शहर
हिंदुत्व दिन सोहळा समितीच्या वतीने वारजे माळवाडीत शोभायात्रा

पुणे : राज्यात करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून या पार्श्वभूमीवर धुमधडाक्यात गुढी पाडवा साजरा होत आहे. वारजे माळवाडीतही हिंदुत्व दिन सोहळा समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोभायात्रेला सायंकाळी 5 वाजता वारजे हायवे चौकातून सुरुवात होणार आहे. गणपती माथा चौकात शोभायात्रेचा समारोप होईल. यावेळी स्वागतोत्सुक म्हणून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर ओबीसी आघाडीचे सरचिटणीस वासुदेव शिवाजी भोसले, भाजप खडकवासला मतदारसंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी वासूदेव भोसले उपस्थित राहणार आहेत.














































