दुर्गा भरत लगड हिला तायक्वोंदो स्पर्धेत सुवर्णपदक ; नॅशनल स्कूल गेम २०२२ मध्ये मिळवले यश..

पुणे : अहमदाबाद गुजरात येथे पार पड़लेल्या CISCE’S नॅशनल स्कूल गेम २०२२ स्पर्धेमध्ये दुर्गा भरत लगड हिने १७ वर्षा खालील ४२ ते ४४ वजन गटात सुवर्ण पदक मिळविले. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ११ ते १३ ऑक्टोबर रोजी या स्पर्धा पार पडल्या.
दुर्गा लगड ही नांदेड सिटी सिंहगड रोड येथील ओम अकॅडमीमध्ये प्रशिक्षक मोहिते सर,शेडगे सर, आशिष खरात सर यांच्याकड़े तायक्वोंदोचे प्रशिक्षण घेत आहे. २०१९ मध्ये झालेल्या नॅशनल स्कूल गेम्स मध्येही १४ वर्षा खालील गटात दुर्गाने सुवर्णपदक पटकावले होते. आतापर्यंत विविध स्तरावर झालेल्या तायक्वोंदो स्पर्धेत तीने प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजय संपादन केलेला आहे.

लहानपणापासूनच दुर्गाला तायक्वोंदो खेळाची आवड निर्माण झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी या क्रीडा प्रकारात तिने पुढे जावे यासाठी प्रोत्साहन दिले व त्यावर मेहनत घेतली. तिने देशाचे प्रतिनिधीत्व करून देशासाठी मेडल मिळवावे अशी अपेक्षा तिचे वडील भरत लगड यांनी व्यक्त केली आहे. घरच्या पाठिंब्यामुळे व प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणामुळे आपण हे यश संपादन केल्याची भावना दुर्गा लगड हीने व्यक्त केली आहे.












