महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर हा जातीयवाद्यांच्या टोळीतील आरक्षणविरोधी लांडगा : राष्ट्रवादीचे नेते विजय डाकले यांचा प्रतिहल्ला

पुणे : जातीयवादी संघ आणि भाजपा यांचे धोरण हे आरक्षणविरोधी असुन आमदारकीच्या तुकड्यासाठी गळ्यात पट्टा बांधुन घेतलेले गोपीचंद पडळकर हे सध्या लांडग्याच्या भुमिकेत आहेत. स्वतःला मिळालेल्या आमदारीच्या बदल्यात बहुजन – मागास चळवळीचे लचके तोडण्याच काम हा लांडगा करु लागला असल्याचा  प्रतिहल्ला राष्ट्रवादीचे नेते व  क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक विकास समिती, महाराष्ट्र चे अध्यक्ष विजय डाकले यांनी केला आहे. Gopichand Padalkar is an anti-reservation wolf in the casteist gang: NCP leader Vijay Dakle’s counter-attack

पदोन्नतील आरक्षणाच्या मुद्द्यांवर बोलताना पडळकर यांनी काल शरद पवार व अजित पवार यांच्यावर  लांडग्याची भिती दाखवून मेंढर पाळणाऱ्या दलालापासून समाजाने सावध रहायला पाहिजे अशी टीका केली होती. या टीकेला  डाकले यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

Img 20210522 wa0204

डाकले यांनी म्हंटले आहे की, शरद पवार यांची भुमिका ही कायम सर्व जाती- धर्माला न्याय देण्याची राहिली आहे. प्रत्येक समाजाला न्याय देत असताना,  मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव विद्यापीठांस देऊन मुख्यमंत्री पदावर असताना सत्तेची आहुती दिली आणि मागास बहुजनांच्या लढ्यास बळ दिले. अजित पवार हे लोकांमधून निवडुण आलेले नेतृत्व आहे. आजच्या घडीला राज्यातील सर्वाधिक काम करणारे ते नेते आहेत. नाविन्याचा ध्यास घेणारे अजितदादा जनतेसाठी अहोरात्र राबत आहेत म्हणुनच जनता त्यांना त्यांच्या समोरच्याच डिपॅाझिट घालवुन वारंवार लाखोंच्या मतांनी निवडुण देत आहे.

जनतेनी तुम्हाला तांदळातल्या खड्यांसारख बाजुला केलं आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतला आहे. बहुजन समाजातील एक कार्यकर्ता आमदार झाला याचा आम्हाला आनंद आहे.  परंतु बहुजनांच्या प्रश्नांवर लढायच सोडुन पडळकर बहुजनांच्या नेत्यावर टिका करुन तोंडसुख घेत आहेत.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पशुपालक समाज लसीकरणापासून वंचित असल्याचे तुम्हाला दिसत  नाही का ? केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षा रद्द केल्या यावर तुम्हाला बोलता येत नाही नाही का ? आधी खताचे भाव वाढवून नंतर मोठी सबसीडी दिल्याचा आव आणणारा केंद्रातील भोंदू दिसला नाही का ? असे सवाल डाकले यांनी पडळकर यांना विचारले आहेत.

स्वतःच्या स्वार्थाकरीता स्वाभिमान घान ठेवणाऱ्या पडळकरांनी चमकोगिरीपेक्षा बहुजन – मागासांच हित कशात आहे हे लक्षात घ्यावे आणि जातीयवाद्यांच्या हातातलं बाहुलं बनुन समाजाच नुकसान करु नये. बहुजन मागास वर्गाच नेतृत्व शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टिका करण्याअगोदर स्वतःची राजकिय उंची , समाजातील लायकी पहावी. अन्यथा तुम्हाला समजणाऱ्या  भाषेत ऊत्तर देऊ असा इशारा डाकले यांनी पडळकर यांना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये