कोथरुड

कोथरूडमध्ये भव्य दांडीया गरबा महोत्सवाचे दि.9 रोजी आयोजन; कोथरूड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे यांची माहिती 

कोथरूड :  राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने कोथरूड भागातील जीत मैदानावर दि.9 ऑक्टोबर बुधवार रोजी भव्य दांडीया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कोथरूड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष व महोत्सवाच्या संयोजक कांचन कुंबरे यांनी दिली आहे.

कांचन कुंबरे म्हणाल्या, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कोथरूड भागातील नागरिकांसाठी भव्य दांडीया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द अभिनेते हार्दिक जोशी आणि प्रसिध्द अभिनेत्री अक्षया देवधर उपस्थित राहणार आहेत. 

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी भाजप कोथरूड कार्यालय, कर्वे रस्ता, शितल हॉटेल शेजारी येथे पास उपलब्ध असणार आहेत. संपर्क क्रमांक 9011304150 तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन कुंबरे यांनी केले आहे.

Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये