पुणे शहर

वारजेत महिलांनी बनवलेल्या गृहउपयोगी वस्तूंच्या भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

वारजे : वारजे येथे दिवाळी निमित्त महिलांनी बनवलेल्या गृहउपयोगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Img 20231103 wa00143894555162383130622

यावेळी सुनीता डांगे, नीलम डोळसकर, भावना पाटील, शांता नेवसे, प्रभावती कानगुडे उपस्थित होते. प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून मानसी नलावडे व महादेव गायकवाड यांनी काम पहिले आहे.

दरवर्षी दिवाळी पूर्वी चार दिवस महिलांनी बनवलेल्या गृहउपयोगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांच्या कडून आयोजन करण्यात येत असते. यामुळे बचत गटातील महिलांना दिवाळीपूर्वी एक चांगली बाजारपेठ मिळते. या चार दिवसांमध्ये वारजेतील अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत खरेदी करत असतात. या प्रदर्शनामध्ये दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणती, मसाले, पापड, लोणचे, रांगोळी, फॅन्सी कपडे, खाद्य पदार्थ अशा विविध गृहउपयोगी वस्तुंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच पन्नास टक्के सवलतीत इलेकक्ट्रॉनिक वस्तू व सायकली ही प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

गुरुवार २ नोव्हेंबर ते रविवार ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत रोज सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत माई मंगेशकर हॉस्पिटल शेजारी हे प्रदर्शन व विक्री महोत्सव सुरू राहणार आहे.

या महोत्सवात अनेक महिला सहभागी होतात या सहभागी स्टाॅल धारकांकडून कुठलीही फी अथवा शुल्क आकारले जात नाही. सर्व सोयीयुक्त सुविधा मोफत पुरविल्या जातात. या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत, तसेच या छोट्या महिला व्यावसायिकांना कायम स्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती या महोत्सवाच्या मुख्य आयोजक विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी दिली.

Img 20230717 wa0012281292712276676815194924
Img 20231103 wa00024760441133993843783
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये