डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

पुणे :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी नगरसेवक प्रदिप गायकवाड, महेंद्र पठारे, दयानंद ईरकल, नाना नलावडे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अझिम गुडाकुवाला, सचिन डाकले, वैजनाथ वाघमारे , राम कसबे, वामन धाडवे, अरुण आल्हाट, शंकर तेलंगे, संतोष गायकवाड, राम कांबळे, विधानसभा अध्यक्ष संतोष बेंद्रे, संजय भापकर, श्रीनिवास दासारी, विजय बगाडे, निलेश माझिरे, आनंद कदम, रवी वाघमारे , अमोल लांडगे , हेमंत गायकवाड, वैभव जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .



