कोथरुड

कर्वेनगरमध्ये मतदारनोंदणी अभियान; विरेश शितोळे यांच्या हस्ते डिजिटल वोटर आयडी कार्डचे वाटप…

कर्वेनगर : विरेश शितोळे यांच्या वतीने कर्वेनगर भागात घेण्यात आलेल्या मतदार नाव नोंदणी, तपासणी व दुरुस्ती अभियानामध्ये सहभागी झालेल्या २२३० नागरिकांपैकी पहिल्या टप्प्यातील ४५० नागरीकांना डिजिटल वोटर आयडीचे वाटप करण्यात आले. विरेश शितोळे यांच्या हस्ते डिजिटल वोटर आय डी कार्डचे वितरण करण्यात आले. Distribution of Digital Voter ID Card by Viresh Shitole …

यावेळी नवीन तरुण मतदारांनी डिजिटल वोटर आयडी कार्ड मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा आपण मतदानाचा हक्क बजावणार असून त्याबाबत उत्सुकता असल्याच्या भावना यावेळी काही नवीन मतदारांनी व्यक्त केल्या.

लोकशाही बळकट करण्यासाठी विरेश शितोळे मित्र परिवाराच्या वतीने संपूर्ण प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. आतापर्यंत २२३० नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ४५० नागरिकांना डिजिटल वोटर आयडीचे वाटप करण्यात आले असून उर्वरित नागरिकांनाही लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

नव्याने मतदार यादीत नाव नोंदणी झालेल्या तरुण-तरुणींना डिजिटल वोटर आयडी मिळाल्यानंतर झालेला आनंद पाहून केलेल्या कामाचे समाधान मिळाल्याचे राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेश शितोळे
यांनी सांगितले. मतदार नाव नोंदणी सुलभ पद्धतीने करता यावी म्हणून हे अभियान राबवले असून त्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये