पुणे शहर
घरातील गणपती बाप्पा समोर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा देखावा

पुणे: दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील एरंडवणे मधील श्री अमित अग्रवाल व परिवाराने सार्वजनिक गणेश मंडळा प्रमाणे घरातील गणपती बाप्पा समोर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा देखावा सजावट केली आहे.
कोथरूड,एरंडवणे व पुणे शहरातील विविध भागातून गणेशभक्त अग्रवाल यांच्या घरी देखावा पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. गणेशोत्सवाची अनेक वर्षाची परंपरा पुढे नेत एकदम थाटामाटात बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत घरातील वातावरण भक्तिमय करून बाप्पांना निरोप देण्यात येतो. पुढच्या वर्षी देखील अश्याच पद्धतीचा सुंदर देखावा पाहण्यास मिळेल यात शंका नाही. असे अमित अग्रवाल यांनी सांगितले.
















