अमित ठाकरे यांचे कोथरूड मध्ये जंगी स्वागत..!

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांनी कोथरूड मधील अनेक गणेश मंडळांना भेट दिले. सायंकाळी ७ वाजता एरंडवणे येथील ओंकार मंडळाच्या श्रींची आरती।करून कोथरूड मध्ये प्रवेश केला व एक भव्य रॅली तयार होत ताफा पुढे कोथरूड विभागात फिरू लागला.
पौड फाटा, रामबाग कॉलनी, जयभवानी नगर, राजमाता जिजाऊ नगर ( सुतार दरा), शास्त्रीनगर, आझाद नगर, गुरुगणेश नगर व भुसारी कॉलनी या भागातील अनेक प्रमुख मंडळांना अमित ठाकरे यांनी भेट दिले. मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे व मनविसे शहराध्यक्ष अमोल शिंदे ह्यांनी या रॅली चे नियोजन केले.

कोथरूड मध्ये सर्वच भागांत अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीला कोथरूडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी ठाकरे पुत्राबरोबर फोटो काढले. मुली व लहान मुलांनी सेल्फी घेतल्या. “ह्यावेळी कोथरूड मधून दोन आकडी नगरसेवक निवडून आणायचे,ही प्रत्येक सीट जिंकायची” असा निश्चय अमित ठाकरे यांनी विभाग अध्यक्ष सुधीर धावडे ह्यांच्याकडे व्यक्त केला.
ह्यावेळी मनसे नेते साईनाथ बाबर, बाळा शेडगे, अजय शिंदे, किशोर शिंदे ह्यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
























