पुणे शहर

कोथरुडमध्ये शेकडो कारसेवकांच्या उपस्थितीत निनादला ‘जय श्रीराम’चा जयघोष, महाआरती आणि सन्मान सोहळा!

श्री साई मित्र मंडळात श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री. गोविंददेव गिरिजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात योगदान दिलेल्या पुणे शहरातील कारसेवकांच्या हस्ते कोथरूड मधील श्री साई मित्र मंडळात गणरायाची महाआरती संपन्न झाली. भारावलेल्या वातावरणात आणि जय श्रीरामच्या जयघोषात झालेल्या या महाआरतीवेळी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री. गोविंददेव गिरिजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भाजपचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, चार दशकांपूर्वी झालेल्या प्रभू श्रीराम मंदिर जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या आणि मोठ्या संख्येने जमलेल्या कारसेवकांनी साधलेल्या संवादाच्या माध्यमातून इतिहास उलगडला. कारसेवकांच्या त्यागाचे, संघर्षाचे फलित म्हणजे श्रीराम मंदिराची निर्मिती. कारसेवकांप्रती कृतज्ञता, अभिवादन व्यक्त करण्यासाठी या महाआरती मागची भावना होती. शेकडो किमीचा पायी प्रवास, जीवाची पर्वा न करता कारसेवकांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील.

Fb img 16956579115787331769668480139867

यावेळी सर्व मान्यवरांनी साकारलेल्या देखाव्याची उत्सुकतेने माहिती घेत, देखाव्याचे कौतुकही केले. यावेळी सर्वांचे यथोचित स्वागत केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह मा.डॉ. प्रवीणजी दबडघाव आणि पुणे महानगर संघचालक मा.श्री. रविंद्रजी वंजारवाडकर यांच्यासह शेकडो कारसेवक, श्रीराम भक्तांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.

Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20230918 wa00151938826641720746050
Img 20221228 wa0001282294128958397815578022
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये