पुणे शहर

चार दिवसीय किर्तन महोत्सव हरिनाम नाद घुमणार; माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनतर्फे आयोजन

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सांप्रदायिक मंडळींसाठी श्रावण मासाच्या पवित्र शुभारंभालाच एक नवी पर्वणी सुरू केली आसून जागर हरिनामाचा! या चार दिवशीय कीर्तन महोत्सवाचे माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या तर्फे दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनच्या वतीने ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान दामिनी लॉन्स कोंढवे-धावडे येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

 पहिल्या दिवशी किर्तन महोत्सवाचा शुभारंभ ह.भ.प. रामायणाचार्य श्री.रामरावजी महाराज ढोक नागपुर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाला आसून कीर्तन ऐकण्यासाठी खडकवासला मतदारसंघातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती एक आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण यावेळी तयार झाले होते किर्तना नंतर वारकरी  क्षेत्रातील अध्यात्मिक सांप्रदायिक काम करणाऱ्या 11 कीर्तनकारणांचा सत्कार करण्यात आला.

Fb img 16474137314571819310932637888379

खडकवासला मतदारसंघांमध्ये कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, अहिरे, मोकरवाडी, वारजे, कर्वेनगर, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, कोथरुड, भुसारी कॉलनी, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, वडगाव बु., वडगाव खुर्द, उत्तमनगर, शिवणे, खडकवासला, कोपरे, कुडजे, खडकवाडी, मांडवी खुर्द, मांडवी बु., बहुली, आगळंबे, सांगरुण, जांभळी, आंबी, सोनापूर, मालखेड, खानापूर, मणेरवाडी, गोहे खुर्द, गोहे बु., डोणजे, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड, धायरी, नन्हे, आंबेगाव पठार, सणसनगर, आतकरवाडी, वरदाडे, खामगाव मावळ, अवसरेनगर, आर्वी, गाऊडदरा, गोगलवाडी, शिवापूर, तानाजीनगर, कोंढणपूर, कल्याण, मोगरवाडी, मोरदरवाडी, रहाटवडे, श्रीरामनगर, खेड शिवापूर अशा पंचक्रोशीत कायमच नित्य हरीनामाचा गजर, हरिपाठ भजन आणि विविध कार्यक्रम भजनी मंडळी करत असतात.

Img 20240404 wa00123413096165072096535

नुकत्याच पांडुरंग भेटीवरून पालख्या मूळ मुक्कामी स्थिरावले आहेत या अनोख्या पालखी सोहळ्यातही खडकवासला विधानसभा मतदारसंघातून पारंपारिक पिढ्यानपिढ्या ज्या दिंड्या साथ देत पंढरपूर कडे जातात त्या सर्व दिंड्यांचे वारकरीही या कीर्तन महोत्सवामध्ये उत्साहाने साहेब सहभागी होणार आहेत. 

खडकवासला मतदारसंघात होत असलेल्या या कीर्तन महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत प्रामुख्याने खालील दिंड्या • गोहेकर संस्था रथामागे क्र.१९ • नांदेडकर दिंडी रथापुढे १५(भरजरी ध्वज), क्षत्रिय मराठा दिंडी रथामागे क्र. ९७ • जशेश्वर पंचक्रोशी दिंडी रथामागे क्र.४७ • मुळशी तालुका दिंडी रथामागे क्र. ९६ • मुठा खोरे वारकरी समिती • मुक्ताबाई बेलगावकर रथामागे क्र.५९ • बोराटे माऊली दिंडी क्र. ७७, संतकृपा प्रासादिक दिंडी क्र. २०१ रथामागे • बाळाराम महाराज कांबेकर दिंडी • वेल्हा तालुका दिंडी रथामागे क्र.८८ • भोर तालुका दिंडी रथापुढे क्र. १७ • हरिबाबा दिंडी, शिवगंगा खोरे सर्व दिंडी कीर्तन साथ संगत देणार असल्याने या कीर्तन महोत्सवाला एक वेगळ्या प्रकारची उंची निर्माण होणारं असून खडकवासला विधानसभेत हरिनामाचा भव्य जागर घुमणार असून संपूर्ण खडकवासला मतदारसंघांमध्ये दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनच्या ‘भव्य कीर्तन महोत्सव’ ची चर्चा सुरू झाली असून दिग्गज किर्तनकारांची मांदियाळी येणार असल्याने या मोठ्या कीर्तनकारांना ऐकण्यासाठी गावागावातून संप्रदायिक मंडळी एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Img 20240404 wa00134916733315783821383

या कीर्तन महोत्सवाला एक वेगळ्या प्रकारची उंची निर्माण झाली आसून खडकवासला विधानसभेत हरिनामाचा भव्य जागर घुमणार आहे संपूर्ण खडकवासला मतदारसंघांमध्ये दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनच्या ‘भव्य कीर्तन महोत्सव’ ची चर्चा सर्वत्र सुरू झाली आसून मोठ्या कीर्तनकारांची मांदियाळी नागरिकांना ऐकण्यासाठी  भेटणार आहे संपूर्ण किर्तन महोत्सवा मध्ये महिला भजनी मंडळ भजनसेवा दररोज दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान हरिपाठ माऊली ज्ञानसंस्कार गुरुकुल,मांडवी दररोज सायं. ५ ते ६ केला जाणार आहे. तसेच कीर्तनानंतर महाप्रसादाचीही सोय करण्यात आली आहे आयोजक दिलीप वेडेपाटील यांनी आलेल्या सर्व नागरिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बदल आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये