आरोग्य

चाळीशीनंतरचे स्त्रियांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी :  डाॅ.सीमा पाटील

प्रत्येक स्त्रियांना आपल्या आयुष्यात कधीही लवकर येऊ नये असे वाटणारा कालावधी म्हणजे चाळीशी.
वयाची कितीही लपवालपवी केली तरीही वयाची चाळीशी येतेच. आयुष्यात चाळीशी ही शाररिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक बदलाची एक नांदीच असते.

वयाच्या 12 -15 वयापासून सुरू होणारी मासिकपाळी चाळिशीनंतर बर्याच स्त्रींमध्ये सुरुवातीला अनियमित होऊन 2/3 वर्षात बंद होते. त्यालाच रजीनिवृत्ती, मेनोपाॅज असे म्हणतात. रजोनिवृत्तीनंतर शरिरात बरेच हार्मोनल बदल घडतात उदाहरणार्थ..1) घाम येण्याचे प्रमाण वाढत जाते. शरिर सारखे गरम होणे, ह्रदयाची गती वाढणे, झोपे व्यवस्थित न होणे, 2) शरिराला जडत्व येणे,वजन वाढत जाणे, भूक कमी होत असताना देखील वजन वाढताना दिसून येते.3)काही महिलांना ह्याच कालावधीमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह याची सुरुवात होते. 4) लघवी करताना त्रास होणे,वारंवार लघवी होणे. 5) योनी मार्ग कोरडा पडू लागतो. योनी मार्गाची अंतर त्वचा कोरडी होऊन दाह /आग होते. 6) लैंगिकभावना कमी होणे. 7) हाडांमधील कॅल्शियम, व्हिट्यामिन ड चे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ नाजूक बनण्यास सुरूवात होते व हाडे ठिसूळ झाल्यामुळे अस्थीभंग होण्याची शक्यता वाढते.

कंबर,मान पाठ ,गुडघे दुखीचे प्रमाण ह्याच दरम्यान वाढलेले दिसून येते. त्वचा पातळ होणे,चेहर्‍यावर, अंगावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते. स्वभाव चिडचिडा होणे. कामातील एकाग्रता कमी होणे, उत्साह कमी होणे,थकवा येणे वाढते.

Img 20211014 wa0004

वैद्यकीय सल्ला
महिलांनी वयाच्या चाळिशीनंतर मासिकपाळी जाण्याच्या कालावधी मध्ये व वरील कोणतीही लक्षणे जाणवू लागली की लगेच आपल्या फॅमिली डॉक्टरांचा अथवा फिजीशियन अथवा अस्थीरोग तज्ञ अथवा स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला गरजेनुसार घ्यावा.

प्रामुख्याने करावयाच्या तपासण्या
1) रक्तदाब तपासणी, शरीरातील साखरेचे प्रमाण…
2) थाॅयराईड ची तपासणी
3) स्तनाची चाचणी, मॅमोग्राफी तपासणी
4) गर्भाशय योनी मार्ग तपासणी, पॅप स्मियर तपासणी
5) शरीरातील तेल, कोलेस्टेरॉलची तपासणी.
गरजेनुसार ह्रदयाची तपासणी, ईसीजी/ टूडीइको तपासणी, फुफ्फुसाची ताकद तपासणी.
6)हाडांचा ठिसुळपणा चाचणी बी.एम.डी.तपासणी

घ्यावयाची काळजी
आपल्या शरीरामध्ये झालेला बदल हा नैसर्गिक बदल असून त्या बद्दल गैरसमज न करून घेता योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा, नियमित व्यायाम,सकस आहार घेणे, व्यसनांपासून दुर राहणे,  कॅल्शियम युक्त घटकांचा आहारामध्ये समावेश करून घेणे. कोणतीही शाररिक मानसिक तक्रार शंका असल्यास प्रत्यक्ष डाॅक्टरांना भेटून शंकानिरसन करून घ्यावे.

डाॅ.सिमा पाटील (ओम हाॅस्पीटल पुणे)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये