महाराष्ट्र

येथे आहे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास ; एमटीडीसी चा उपक्रम

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभाग

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथील सर्व कर्मचारी या महिला असून येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आणि आदरातिथ्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज झाले आहे. पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते आज मुंबई, छत्रपती संभाजी नगर, खारघर येथे महिला संचलित पर्यटक निवासाचा शुभारंभ करण्यात आला.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग हा महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेवृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण शासनाद्वारे राबविण्यात येत आहे.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित धोरण आखण्यात आले असून त्याच्या पंचसुत्रीनुसार हे धोरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन संचालनालय यांच्यामार्फंत सर्व विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांनी तसेच पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर व अर्का उपहारगृह, खारघर येथे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात येणार असून त्याअनुषंगाने सर्व प्रादेशिक कार्यालये व पर्यटक निवासे येथे “आई” महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे.

Img 20231112 wa00314068627009214606118
Fb img 16997856846731842935112977471072

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होम स्टे, हॉटेल /रेस्टारंट, टूर ॲण्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विविध प्रोत्साहने आणि सवलती देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शक, महिला वाहन चालक, महिला सहल संचालक (टूर ऑपरेटर) व इतर महिला कर्मचारी यांना केद्र आणि राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

Img 20231112 wa00084245679956121736894
Fb img 16997545332478063009632470005805

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फंत आयोजित पर्यटन सर्किंट / पॅकेजस मध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत असून महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस/युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठराविक कालावधीत फक्त ऑनलाइन बुकिंगमध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादीच्या विक्रीसाठी स्टॉल / जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा जसे की, अपंग किंवा वृद्ध महिलांकरीता लिफ्ट जवळच्या खोल्या उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य, महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल. इ. बाबी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहेत.

Fb img 16997796665812736881535248315558
Digital 20231112 123519 00006696680381270481811

महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढविणे आणि सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्राधान्याने काम करीत असून त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवासामध्ये 82 खोल्या त्यामध्ये लक्झीरियस सूटस पासून स्टॅडर्ड रूम अशी वगर्वारी आहे. हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. निवासामध्ये उपहारगृह असुन विविध स्थानिक पदार्थ आणि रुचकर जेवणाची मेजवानी सदरच्या उपहारगृहामध्ये उपलब्ध आहे.

Fb img 169979232846028756813723168556
Img 20231112 wa00131228884357653556833

या पर्यटक निवासामध्ये प्रशस्त लॉन असुन मुलांसाठी विविध खेळणी आहेत. साधारणपणे 50 लोकक्षमतेचा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध असून आगामी काळात या ठिकाणी जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, महिला व्यायामशाळा अशा सुविधा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे, छत्रपती संभाजीनगरवासियांनी आणि राज्याच्या पर्यटन राजधानीत येणाऱ्या पर्यटकांनी सदरच्या उपक्रमात यापुढेही सहभाग घेवुन भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा जपत पर्यटनाचाही आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

संध्या गरवारे/विसंअ/

Img 20231112 wa0029506383627803066877
Img 20231112 wa00232265529059577421901
Img 20231112 wa0091613963473782521233
Img 20231112 wa00072576930588635310622
Img 20231112 wa00068214416706074968579
Img 20231112 wa00175045938042750537567
20231112 164930 00006017738161611838688
Img 20231112 wa00222708193954240525371
Img 20231112 wa00348639945291975793133
Img 20231112 wa00356868697546848260642
Fb img 16997796205907478989327917216608
Fb img 16997852760747462415593982140082
Img 20231112 wa00166298405371436066105
Img 20231111 wa00138990855750371916874
Img 20231112 wa00193038845121130085932

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये