पुणे शहर

संजय भोर यांना घनकचरा व्यवस्थापनातील कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

पुणे : भोर इंडस्ट्रीजचे संचालक व शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष संजय भोर यांचा घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल इंटरनॅशनल सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

4 20221222 114702 00036743743268939608522

संजय भोर हे गेली अनेक वर्ष पुणे परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची पुणे महापालिकेत स्वीकृत सभासद म्हणून निवडही करण्यात आली होती. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी ते प्रयत्नशील असून आपल्या भोर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून निर्मिती केलेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या मशीनमुळे घनकचरा प्रश्नावर तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. वृक्षारोपण, कचरा वर्गीकरण यासाठी त्यांनी उपक्रम राबवत जनजागृती केली आहे.

नवीन तरुणांना रोजगार मिळावा, नवीन उद्योजक घडले जावेत यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना इंटरनॅशनल सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.

या मिळालेल्या पदवीमुळे आणखी काम करण्यास प्रोत्साहन मिळाले असून जबाबदारी ही वाढली आहे. कचरा व्यवस्थापन व पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून त्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवणार आहे. – संजय भोर

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये