कोथरूडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्लाबोल ; विविध चौकांमध्ये ‘होऊ द्या चर्चा’, ‘बोलघेवडया सरकारचा भांडाफोड’ कार्यक्रम

कोथरूड : शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड मधील विविध ठिकाणी मुख्य चौकांमध्ये करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली.
कोथरूड मधील सुतार दवाखाना, आशिष गार्डन चौक, किनारा हॉटेल चौक, मोरे विद्यालय चौक सुतारदरा, नवभूमी शास्त्रीनगर, किष्किंदानगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक कोथरूड गावठाण या ठिकाणी होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड कार्यक्रम एकाच दिवशी पार पडला. या कार्यक्रमामध्ये लोकत सांस्कृतिक ग्रुपच्या वतीने पथनाटयद्वारे नागरिकांमध्ये सत्तारूढ पक्षाच्या नाकर्तेपणाची माहिती देण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमासाठी सह- संपर्क प्रमुख अदित्य शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, योगेश मोकाटे, चंद्रकांत मोकाटे , शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, बेरोजगार तरूण, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ठिकठिकाणी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवाधिकारी राम थरकुडे, नितीन शिंदे, अनिल भगत, आकाश सुतार, विशाल उभे, उमेश भेलके, जयदिप पडवळ, योगेश थोरात, चेतन डेरे, भारत सुतार, दिलीप गायकवाड, नितीन पवार, पुरषोत्तम विटेकर, मनोज आल्हाट, श्रीपाद चिकणे, कांता बराटे, सुधीर जानोरकर यांनी प्रयत्न केले.













