आरोग्य

Winter Special : थंडीत अशी घ्या त्वचेची काळजी

पुणे : राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. यामुळे अनेकांना आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, असा प्रश्न पडला आहे. तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि सतेज राहील.

1 ) हिवाळ्यात चांगल्या दर्जाचे खोबऱ्याचे तेल त्वचेला लावणे खूप उपयुक्त आहे. यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि तेजोमय राहील.

2 ) तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकावा. या पाण्यात हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.

3 ) लिंबाच्या सालीने हात व पाय घासावे. दहा ते पंधरा मिनिटानंतर हात पाय स्वच्छ कापडाने अथवा रुमालाने पुसून टाकावे.

4 ) हात व पायांना आवडीनुसार बॉडी लोशनचा वापर करावा. बाजारात काही आयुर्वेदिक लोशनही उपलब्ध आहेत.

5 ) साबणाच्या वापरामुळेही त्वचा फुटण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे साबण निवडतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी. हिवाळ्यात साबणाचा अतिवापर टाळावा. यामुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते.

( या लेखात सुचविण्यात आलेले उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. केवळ सर्वसामान्य आरोग्य स्थिती असणाऱ्यांसाठीच हे उपाय सुचविले आहेत.)

Img 20220123 wa0404

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये