राष्ट्रीय

बिपीन रावत यांच्यासह चौघांना ‘पद्मविभूषण’ ; सुंदर पिचाई, सत्या नाडेला यांचा ‘पद्मभूषण’

नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. तर, कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार –

प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेश्याम खेमका(मरणोत्तर)

Img 20220123 wa0404

पद्मभूषण पुरस्कार – सायरस पुनावाला (व्यापार आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद

पद्मश्री पुरस्कार –

बालाजी तांबे, विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया

दरम्यान, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये