अर्थजगत

Petrol Price : सहा दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

पुणे : देशात महागाईचा भडका उडालेला असतानाच मागील 6 दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. रविवारी (27 मार्च 2022 ) पेट्रोल 50 पैशांनी, तर डिझेल 55 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे सहा दिवसात 3 रुपये 75 पैशांपर्यंत ही इंधन दरवाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित यामुळे कोलमडू लागले आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर आता 113 रुपये 85 पैसे इतका झाला आहे. सर्वसामान्यांची रोजची सकाळ आता पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहूनच सुरू होत आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये