पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे देऊळ मनसेने उघडले

पुणे : स्वतःला हिंदुत्त्ववादी समजणारी आणि हिंदुत्त्ववाच्या नावावर मते मागणारी आणि आत्ता सत्ताधारी असलेली. शिवसेना सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचा आरोप करीत पुण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरात प्रवेश करीत आंदोलन केले.

महाराष्ट्रात सर्व व्यवसाय सुरु झाले आहेत. मद्यालये, हॉटेल , दुकाने इतकेच नाही तर जे खाऊन थुकल्या नंतर करोना होऊ शकतो पसरू शकतो तो गुटखा हि सगळी कडे मिळू लागला आहे . मात्र करोना होईल किंवा पसरेल म्हणून मंदिरे बंद ठेवण्यास सरकार भाग पडत आहे. गेल्या महिन्यातच महाराष्ट्रातील देवस्थानाची प्रमुख मंडळी मनसे अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे याना भेटली होती. त्या नंतर राजसाहेबांनी सरकारला मंदिरे सुरु करावीत हि मागणी देखील केली होती . परंतु अंतर्गत दबावा पोटी सरकार मंदिरे उघडू देत नाही .
म्हणूनच आज मनसेने पुण्याचे ग्राम दैवत असणाऱ्या कसबा गणपती देऊळ आज उघडले व देवळात जाऊन प्रतीकात्मक होम करीत देवाला नागरिकांना करोना मधून लवकरात लवकर मुक्त कर व करोना मुळे आलेली बेकारी व महागाई यातून जनतेची सुटका कर हे साकडे घातले व सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल हा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.
या आंदोलनात मनसे नेते बाबू वागसकर,विजयराव तडवलकर, प्रल्हाद गवळी , राम बोरकर ,हेमंत बत्ते, सुनील कदम , राहुल गवळी , नरेंद्र तांबोळी , प्रशांत मते ,गणेश नायकवडी ,सचिन काटकर ,राजेंद्र वेडेपाटील , किशोर चिंतामणी , गणेश भोकरे , राकेश क्षीरसागर , गोकुळ अडागळे अविनाश जाधव , अभिजित येनपुरे ,उदय गडकरी , अतुल जाधव ,अनुप जाधव , प्रवीण क्षीरसागर, शंकर पवार , आकाश धोत्रे सहित शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



