क्रीडा

पुण्यात या तारखेला रंगणार रोलबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा..

पुणे : pune city महाराष्ट्र रोल बॉल संघटना व रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने १८ वी राष्ट्रीय स्पर्धा पुण्यातील शिव छत्रपती क्रीडानगरी मध्ये दि.. १९ मे ते २२ मे २०२२ दरम्यान होणार आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू दाभाडे आणि संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकयांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धसाठी संपूर्ण देशामधील २४ राज्याचे एकूण ४० संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन १९ मे २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वा. क्रिडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र राज्य आयुक्त ओम प्रकाश बोकरिया यांच्या हस्ते व एक्झिट डायरेक्टर NS NIS, sports authority of India, पतियाळा (निवृत) डॉ. सुधांशू शेखर राय, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे उद्योजक सूर्यकांत काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

तसेच स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस समारंभ दि.२२ मे २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, पद्मश्री, पद्मभूषण सिंबायोसिस इंटरनेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ.एस.बी मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये