महाराष्ट्र

घोडावत कंझ्युमर वार्षिक संमेलन; रत्नागिरीतील खाद्यतेल वितरकांना पुरस्कार देऊन गौरव

घोडावत कन्झ्युमरच्या सीओओ सलोनी घोडावत यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : घोडावत कंझ्युमर च्या वार्षिक संमेलनात रत्नागिरीतील खाद्यतेल वितरकांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. घोडावत कन्झ्युमरच्या सीओओ सलोनी घोडावत यांची प्रमुख उपस्थिती असलेली ही परिषद नुकतीच कोल्हापुरात पार पडली. या कार्यक्रमादरम्यान, कोकण विभागातील स्टार खाद्यतेलाची सर्वाधिक विक्री (ठोक आणि किरकोळ) करणाऱ्या वितरकांचा गौरव करण्यात आला. सलोनी घोडावत यांनी वैयक्तिकरित्या वितरकांच्या मेहनतीची दखल घेऊन प्रमाणपत्रे आणि सोन्या/चांदीची नाणी दिली.  पुरस्कार  व  गौरव  झालेल्या वितरकांमध्ये भानू एजन्सी – संगमेश्वर, कासम मोहम्मद मेमन – शृंगारताली, नावेद ट्रेडर्स – रत्नागिरी, श्रीगणेश सुरेश खाडिलकर – रत्नागिरी आणि युनूस सेल्स – राजापूर यांचा समावेश होता. कार्यक्रमादरम्यान  घोडावत कंझ्युमर कडून  ८५ ग्राम पर्यन्त सोने व १ किलो पर्यन्त चांदी वितरकांना पुरस्कार म्हणून देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान, जीसीएल चे व्यवस्थापकीय संचालक – श्रेणिक घोडावत यांनी कंपनीसोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वितरकांचे आभार मानले. आम्ही या वर्षी २०% च्या CAGR सह YoY आधारावर ,१६०० कोटींचा महसूल मिळवू शकलो आहोत आणि २०२४ पर्यन्त २००० कोटी गाठण्याच्या मार्गावर आहोत. घोडावत यांनी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आश्वासने पूर्ण करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेवर भर दिला.

गेल्या २०  वर्षांपासून जीसीएल चा सुप्रसिद्ध ‘स्टार’ ब्रॅंड चे खाद्यतेल स्थानिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. जीसीएल हा संजय घोडावत ग्रुप ((एसजीजी या कंपनीचा एफएमसीजी उद्योग  आहे. २०१३ साली स्थापित केलेल्या जीसीएलने आपल्या ग्राहक-केंद्री उद्योग धोरणांद्वारे लाखो लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

जीसीएल ने खाद्यतेलाचे उत्पादनापासून आपला प्रवास सुरू केला होता.  खाद्य तेलाला ग्राहकांची पसंती मिळत गेली, ग्राहकांकडून मिळालेल्या या पसंती नंतर जीसीएल ने स्टेपल्स, इंपल्स, आणि  बेवरेज श्रेणी मधील प्रॉडक्ट निर्मिती सुरू केली आणि लक्षणीय यश मिळवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला. ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य व उच्च-गुणवत्तेची उत्पादने यांच्या जोरावर जीसीएल एफएमसीजी क्षेत्रालतील अग्रगण्य नाव बनले आहे.

जीसीएल च्या सुप्रसिद्ध ‘स्टार’ ब्रँड अंतर्गत आटा, खाद्यतेल, डाळी, तांदूळ, मीठ, स्नॅक्स, विविध प्रकारचे नमकीन, पाणी , ‘टू बी ऑनेस्ट’ (फ्रूट आणि भाज्यांचे क्रंचीज) हे उत्पादने आज पश्चिम आणि दक्षिण भारतात घराघरात पोहोचलेले आहे. शिवाय फिझिंगा – कार्बोनेटेड पेये, फ्रुस्टार-  फळांचे पेय, कूलबर्ग-  बियर, (बिगर – अल्कोहोलीक), रायडर-   एनर्जि ड्रिंक हे फिझिंगा – कार्बोनेटेड पेये, फ्रुस्टार-  फळांचे पेय, कूलबर्ग-  बियर, बिगर – अल्कोहोलीक, रायडर-   एनर्जि ड्रिंक हे शितपेय क्षेत्रातील काही सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने आहे.

ग्राहक-केंद्रित धोरण  व उत्पादनची गुणवत्ता या जोरावर जीसीएल ने स्वतःला एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून यशस्वीरित्या प्रस्थापित केले आहे. अत्यंत स्पर्धात्मक अशा एफएमसीजी उद्योग क्षेत्रात लक्षणीय वाढ साधली आहे.

संजय घोडावत ग्रुप बद्दल

संजय घोडावत ग्रुप (एसजीजी) हा एक प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक समूह आहे ज्याची विविध उच्च-मूल्याच्या व्यवसायांत उपस्थिती आहे. एव्हिएशन, ग्राहक उत्पादने, शिक्षण, ऊर्जा, खाणकाम, स्थावर मालमत्ता, फुटकळ विक्री आणि टेक्सटाईल हे त्याचे काही प्रमुख व्यवसाय कार्यक्षेत्र आहेत. एसजीजी ची स्थापना १९९३ मध्ये झाली आणि तेव्हापासून तिचे संस्थापक आणि अध्यक्ष- श्री संजय घोडावत यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली त्याची प्रभावी वाढ झाली आहे. ह्या समूहाकडे जागतिक स्तरावर लाखो ग्राहक आहेत, १०,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि १६,००० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. एसजीजी मोठ्या जोमाने पुढे जात आहे आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसह लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये