पुणे शहर

कोथरूडमध्ये व्यावसायिकावर चाकूने वार करून पैशाची बॅग हिसकावून नेली.; घटनेने कोथरूडमध्ये खळबळ

पुणे : दिवसभरात जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी गेलेल्या व्यवसायिकाला अडवून पैशांची बॅग हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना कोथरूड मध्ये घडली आहे. व्यावसायिकाने बॅग देण्यास नकार दिला असता चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले.(In Kothrud, a businessman was stabbed and a bag of money was snatched; Sensation in Kothrud by incident)

ही घटना कोथरुड परिसरातील भुसारी कॉलनी पौड रोडवरील व्हेंच्युरा बिल्डिंगमधील ॲक्सिस बँकेच्या सिडीएम मशिन सेंटर समोर बुधवारी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. चोरट्यांनी 53 हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली.

याप्रकरणी असिफ हाजिसाह मुकेरी (वय-37 रा. आदेश अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. असिफ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 25 वर्ष वयोगटातील दोन दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Img 20210913 wa0011 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये