पुणे शहर

गणपती दर्शनाला जाताना अपघात, कर्वेनगरमधील उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून दुचाकीस्वारांचा मृत्यू

पुणे :  pune – दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या वेळी बाईकने निघालेल्या तरुणांना पुण्यात अपघात झाला. कर्वेनगर भागातील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघाही बाईकस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून ऐन गणेशोत्सवात कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.(Biker dies after hitting flyover in Karvenagar)

पुण्याच्या कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने अपघात होऊन वारजे भागातील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत. शंकर इंगळे (वय 27 वर्ष) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय 20 वर्ष, दोघे रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी मयत तरुणांची नावं आहेत. बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे.

Img 20210913 wa0000

शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे घरच्या गणपतीची आरती करुन रात्री उशिरा पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाईकवरुन निघाले होते. रस्त्यावर गर्दी नसल्याने ते भरधाव वेगाने कर्वेनगर उड्डाणपुलावरुन जात होते. त्यावेळी पुलावरील वळणावर चालकाचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी पुलाच्या डाव्या बाजूला जाऊन धडकली.अपघाताच्या जोरदार आवाजामुळे जवळच असलेल्या पोलीस चौकीतील कर्मचारी धावत घटनास्थळी पोहचले. परंतु, ही धडक इतकी भीषण होती, की दोघांच्या चेहर्‍याचाही चेंदामेंदा झाला होता. पोलीस येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.सलील कोकरे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तर, शंकर इंगळे हा पाण्याचा टँकर पुरवण्याचा व्यवसाय करत होता. दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये