पुणे शहर

कोथरुडमध्ये रक्तदात्याला मिळणार दोन किलो चिकन अर्धा किलो पनीर ; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन..

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोथरुड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास मांसाहारी असेल तर दोन किलो चिकन व शाकाहारी असल्यास अर्धा किलो पनीर भेट देण्यात येणार आहे. एक प्रकारे रक्तदान केलेल्या व्यक्तीस प्रोटीनयुक्त आहार देण्याचा हा प्रयत्न असणार आहे.

माजी सभागृह नेते शंकर केमसे यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  कोथरुड डेपो भुसारी कॉलनी मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर घेण्यात आले आहे.

सध्या रक्तदान केल्यास रक्तदात्यास निरनिराळ्या भेटवस्तू दिल्या जातात. या शिबिरात मात्र रक्तदात्यास रक्तदान केल्यामुळे प्रोटीन युक्त आहार देण्याचा आम्ही विचार केला असल्याचे शंकर केमसे यांनी सांगितले. सध्या कोरोना परिस्थितीमुळे शहरात रक्ताचा तुटवडा वारंवार निर्माण होत आहे, त्यामुळे नागरिकांनी रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केमसे यांनी केले आहे.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये