पुणे शहर
एरंडवणे भागातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये चक्क घोरपड सदृश्य प्राणी; वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू

पुणे : मंगळवारी दुपारी एरंडवणें भागातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये घोरपड सदृश्य प्राणी आढळून आल्याने खळबळ उडाली होती.वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनस्थळी पोहचत या घोरपड सदृश्य प्राण्याला रेस्क्यू कऱण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजता च्या सुमारास एरंडवणे परिसरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये घोरपड सदृश्य प्राणी आढळून आल्याची घटना घडली. उद्यानाच्या शेजारीच असलेल्या कार्यालयात नागरिकांनी माहिती देताच माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी वनविभागाला याची माहिती दिली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या घोरपड सदृश्य प्राण्यास रेस्क्यू केले आहे. आणि पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरी भागामध्ये याठिकाणी हा जंगली प्राणी नेमका कसा काय आला आहे.? याबाबत तर्क वितर्क केले जात आहेत.






