पुणे शहर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या औंध-बाणेर शाखेचा शुभारंभ

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या, पुणे जिल्ह्यातील औंध-बाणेर शाखेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या नवीन शाखेला उत्तम प्रतिसाद मिळत असून यावेळी एकूण 12 नियुक्त्या व 14 नियोजित नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

यावेळी  जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी केतकी कुलकर्णी, सरचिटणीस विकास अभ्यंकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अशोक ठोंबरे यांनी केले होते.

मागील वर्षभरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या 8 नवीन शाखांच्या स्थापना झाल्या असून 20 नवीन आघाड्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थितांनी ब्राह्मण समाजाला पुढे नेण्यासाठी आपली मते मांडली व या भागात जास्तीत जास्त ब्राह्मण कुटुंबे या शाखेशी जोडण्याचा संकल्प केला.

Img 20220801 wa0304
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये