पुणे शहर

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त कोथरूडमधील शेकडो तरुणांचे रक्तदान ; श्रीमानयोगी प्रतिष्ठानचा उपक्रम

शिबिरात ५१८ जणांचे रक्तदान

कोथरूड : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता व आजादी का अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून श्रीमानयोगी प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूडमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५१८ जणांनी रक्तदान केले.

स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले, आपण त्यांच्या या ऋणातून कणभर तरी उतराई होवु म्हणून कोथरूड मधील शेकडो तरुणांनी आजादी का अमृतमहोत्सव या अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. विशेतः युवा ढोल ताशा पथकाच्या सभासदांनी मोठ्या संख्येत उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

Img 20220801 wa0304

यावेळी श्रीमानयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी समाजसेवेचा राष्ट्रसेवेचा हा वसा अविरतपणे आम्ही राबवू असा विश्वास व्यक्त केला तसेच श्रीमानयोगी प्रतिष्ठानला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानले.

श्रीमानयोगी प्रतिष्ठान तर्फे सर्व रक्तदात्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, संदीप खर्डेकर, हर्षाली माथवड, वासंती जाधव, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, पुनीत जोशी, सुशील मेंगडे, जयंत भावे, राघवेंद्र मानकर, अनूप मोरे, नवनाथ जाधव आदी  उपस्थित होते.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये