पुणे शहर

भोर मतदार संघातील अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना वाढता पाठिंबा ; बावधन गावाचा एकमुखी निर्णय..

भोर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे बंडखोर असलेले अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असून गावागावात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. बावधन गावाने किरण दगडे पाटील यांना पाठिंबा दिला असून गावात दुसरा कोणत्याही पक्षाचा बूथ लागू दिला जाणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव किरण दगडे पाटील यांच्या पाठीशी एकवटले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचाही त्यांना पाठिंबा मिळत चालला आहे.

नुकतीच बावधन गावात गावकऱ्यांची बैठक झाली व त्यात किरण दगडे पाटील यांच्या पाठीशी एक संघपणे उभे राहण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे.  किरण दगडे पाटील हे भोर विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून काम करत आहेत. गावागावात त्यांनी निर्माण केलेला संपर्क व येथील नागरिकांशी तयार केलेले आपुलकीचे नाते या निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहेत.

Img 20241020 wa0001435697684176070576

हजारो नागरिकांना घडवलेली काशी विश्वनाथाची यात्रा व यात्रेत आलेल्या ज्येष्ठांची, भगिनींची मुलाप्रमाणे, भावासारखी किरण दगडे पाटील यांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांचे हजारो कुटुंबांबरोबर जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. त्यामुळेच भोर मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशी भागातून वाढता पाठिंबा त्यांना मिळत चालला आहे. आपण हिंदुत्वाचा आणि विकासाचा चेहरा म्हणून ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांही त्यांच्या पाठीशी उभ्या राहत आहेत.

Img 20240404 wa0016281297658999536660438617

या मतदार संघात तीन वेळा निवडून आलेले संग्राम थोपटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर, भाजप बंडखोर किरण दगडे पाटील,  शिवसेना बंडखोर कुलदीप कोंडे,  यांच्यातील लढतीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शंकर मांडेकर यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राष्ट्रवादी अजित पवार गटात येऊन उमेदवारी मिळवली असल्याने राष्ट्रवादीत नाराजीचा सूर आहे. महायुतीत मतदार संघ शिवसेना किंवा भाजपला सुटेल असे वाटत असताना तो राष्ट्रवादीला देण्यात आल्याने या दोन्ही पक्षांतील पदाधिकारी नाराज आहेत. आणि या अनेक नाराजांचा किरण दगडे पाटील यांना पाठिंबा मिळत चालला असल्याचे दिसत आहे. या पाठिंब्यामुळे किरण दगडे पाटील यांची बाजू वरचढ होत चालली आहे.  उमेदवारांमध्ये  मतांची विभागणी कशी होणार आणि त्यात कोणाची सरशी होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये