पुणे शहर

कोथरूड मतदार संघातील अपक्ष उमेदवार विजय डाकले मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला.. काय झाली चर्चा ?

कोथरूड : कोथरूड मतदार संघातील अपक्ष उमेदवार  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय डाकले यांनी आज आंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे वेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून  कोथरूडच्या निवडणुकीतील वातावरण रंगणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

Img 20241020 wa0001435697684176070576

विजय डाकले यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने विविध तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. कोथरूड मधून महायुतीचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यातच महायुतीतील पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विजय डाकले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने वातावरण तापले आहे. आज डाकले यांनी जरांगे यांची भेट घेऊन आणखी एक बॉम्ब फोडला आहे.

विजय डाकले यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे त्यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन या निवडणुकीत मिळावे यासाठी डाकले यांनी ही भेट घेतली असावी अशी चर्चा आहे. मनोज जरांगे पाटील समर्थन देणार का हे आता पहावे लागणार आहे.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202
Img 20240404 wa0012281298193617916566931378

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये