पुणे शहर

पाणी पुरवठा तक्रारी सोडविण्यासाठी उपाययोजना करणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

मतदारसंघातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार शिरोळे यांनी  बुधवारी दिनांक ६ सप्टेंबर ला बैठक घेतली. महापालिकेचे पाणी पुरवठा प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Img 20230717 wa0012281291948762095496285435

यावेळी मतदारसंघातील २४×७ योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. येत्या वर्षभरात मतदारसंघातील टाक्यांचे काम पूर्ण होऊन मीटरही बसविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.

या कामांबाबत सततचा पाठपुरावा सुरू असून २४×७ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20221228 wa0001282294128958397815578022
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये