पुणे शहर

तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्काच्या चंद्रकांत पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

पुणे लोकसभेसाठी चंद्रकांत पाटील यांचे सूक्ष्म नियोजन,सहाही विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय बैठका

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी पाटील सूक्ष्म नियोजन केले असून, गेल्या दोन दिवसांपासून सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये ते पदाधिकाऱ्यांना तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्काच्या सूचना करत आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने महाविजयाचा  संकल्प केला असून, यासाठी सर्वच नेते जिवाचे रान करताना दिसत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात भाजपा पुणे शहरच्या सर्व आघाड्या आणि मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

आता त्यांनी सूक्ष्म नियोजनावर भर दिला असून, सहाही विधानसभा मतदारसंघात प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. याची सुरुवात सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघातून केली. सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५ आणि २९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कोथरुड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट अशा मतदारसंघाची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाचा संकल्प करुन, तोंडात साखर ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले.

Img 20240322 wa00017404573101520546217
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये