पुणे शहर

वारजेत अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रेष्ठदान असणारे रक्तदान करून नागरिकांनी पार पाडले सामाजिक कर्तव्य..

वारजे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान करून श्रेष्ठदान असलेले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बाबा धुमाळ यांनी सांगितले की, इर्शाळवाडीतील दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता व कार्यकर्त्यांना ही तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रम राबववून वाढदिवस साजरा केला असल्याचे ते म्हणाले.

दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांच्या राजयोग सोसायटीतील जनसंपर्क कार्यालयाजवळ ओम ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निलम डोळसकर, मानसी नलावडे, प्रभावती कानगुडे, महादेव गायकवाड, नंदकुमार बोधाई, अरूण पाटील, मोहित वेलाणी, मनिष धुमाळ, सुरेश काळे, बापू हांडे, अनिल गायकवाड, सुरेश जाधव. सुजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश सपकाळ, रूपेश पार्टे, पांडुरंग पाटील व महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये