महाराष्ट्र

IRCTC वरून करता येणार एसटी बुकिंग

मुंबई : रेल्वेप्रमाणेच आता IRCTC च्या (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) वेबसाईटद्वारे एसटी महामंडळाच्या बसचेही तिकीट आरक्षित करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे.

कुठून कसे करणार बुकिंग

https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर नजीकच्या काळात एसटी बसचे तिकीट बूकिंग करता येईल. आयआरसीटीसीच्या ऑनलाइन तिकीट पोर्टलवरून 75 टक्के प्रवासी त्यांच्या रेल्वे प्रवासाची तिकिटे बूक करत आहेत. आता त्यांना महाराष्ट्राच्या एसटी बस बूकिंगची सुविधाही उपलब्ध झाली आहे. यापूर्वी एमएसआरटीसी,रेड बस, मेक माय ट्रीप App वरून एसटीचे बुकिंग करता येत होते.

आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने होणार आहे. या एकत्रीकरणामुळे प्रवाशांना सुरळीत प्रवासाची निश्चिंती मिळेल, असे आयआरसीटीसीच्या सीएमडी सीमा कुमार यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये