आरक्षण हरकती संदर्भात कायद्याला अभिप्रेत असलेले नवीन परिपत्रक काढा..

पुणे : पुणे महापालिकेने सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेल्या परिपत्रकात सुनावणी संदर्भात पूर्ण माहिती नसल्याने हे परिपत्रक कायद्याला धरून नाही. त्यामुळे नवीन परिपत्रक काढण्यात यावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी केली आहे.
या बाबतीतील पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. महापालिकेकडून मंगळवारी ३१ मे रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. तर बुधवार १ जून रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. आरक्षणावर सूचना व हरकती सादर करण्यासाठी बुधवार दिनांक बुधवार १ जून ते सोमवार दि. ६ जून दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
परंतु या परिपत्रकामध्ये हरकती आणि सुनावणी करून घ्यायला कोण अधिकारी असणार आणि त्या सुनावणीचा निर्णय कधी जाहीर करणार याचा उल्लेख नाही. त्यामुळे कायद्याने हे परिपत्रक परिपूर्ण नाही, त्यामुळे हे परिपत्रक मागे घेऊन कायद्याला अभिप्रेत असलेले नवीन परिपत्रक काढावे अशी मागणी उज्वल केसकर यांनी महापालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.




